मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पाळणार संपर्क नेते संजय मशिलकर यांचे शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश -महेश चिवटे शिवसेना जिल्हाप्रमुख
करमाळा प्रतिनिधी
राज्यात शिवसेना भारतीय जनता पार्टी रासप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रयत शेतकरी संघटना महायुती असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करा अशी आदेश सर्व शिवसैनिकांना मुंबई येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहेत त्यामुळे सर्व शिवसैनिक महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करून त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणणार असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख माढा विभाग महेश चिवटे यांनी व्यक्त केला
आहे.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे करमाळाच्या विकासात योगदान असून करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना व मांगी तलावात पाणी आणण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे
जेऊर रेल्वे स्थानकाचा जवळपास 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून सर्वांगीण विकास करून अनेक रेल्वे गाड्यांना करमाळ्यात थांबे मिळून दिले आहेत
जेऊर येथील रेल्वे पुलाखाली भुयारी मार्ग काढून रस्त्याचा प्रश्न सोडवला आहे.जातेगाव टेंभुर्णी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून या रस्त्यासाठी 935 कोटी रुपये मंजूर केले आहेतदर दोन-तीन महिन्याला माढा मतदारसंघात फिरून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे.विशेषता आरोग्याच्या बाबतीत पंतप्रधानांच्या माध्यमातून शेकडो अवयव ट्रान्सफर करणाऱ्या व्यक्तींसाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहेउमेदवार कोण हा विषय शिवसैनिकासाठी महत्त्वाचा नसूनशिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश आम्हाला महत्वाची असून माढा विभागातील पाचही तालुक्यातील शिवसैनिक सर्व ताकतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
