Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळा

महाराष्ट्राच्या भूमीला संताची यशस्वी परंपरा संतांनी नेहमी परोपकराची शिकवण दिली- डॉ. अमोल दुरंदे कोर्टी येथे संत नरहरी महाराज यांची जयंती साजरी

कोटी प्रतिनिधी महाराष्ट्र भूमीला मोठी संतांची परंपरा लाभलेले आहे, संतांनी नेहमी परोपकाराची शिकवण दिली़ आहे असे. मत   सरपंच परिषदेचे करमाळा तालुकाअध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांनी व्यक्त केले ते कोर्टी येथे संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त बोलत होते

असेच एक तेराव्या शतकातील संत म्हणजे संत नरहरी सोनार ते शिवभक्त होते त्यांना एक दृष्टांत झाला व त्यानंतर त्यांनी शिव व विठ्ठल हे एकच रूप आहेत हे मनोमन स्विकारले
आणि त्ते विठ्ठलाला म्हणाले, की देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार.. अशा थोर संतांची आज पुण्यतिथी त्यांची शिकवण ,भक्तिमार्ग आजच्या पिढीने आत्मसात करायला हवा….
यावेळी बँक ऑफ इंडिया कोटीं शाखेचे मॅनेजर राहुल तळेकर यांनी विचार व्यक्त केले
यावेळी मान्यवरांकडून प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी प्रसाद वाटप तसेच संसार उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले..
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजुरी,गणेश जाधव, करमाळा तालुका वकील संघ अध्यक्ष विकास जरांडे , शैलेश शेलार, ,आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक संतोष खाटमोडे पाटील,संजय गाधी योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर,भाजप अनुजाती संघटन सरचिटणीस सचिन खराडे-,मनोज बुऱ्हाडे, किरण टेके, प्रल्हाद वायदंडे, राजेंद्र अभंग, विश्वंभर काळे, राहुल काळे, दादासाहेब खाटमोडे,बबन राऊत, मुफाराम चौधरी, विजय गुड, किरण मेहेर, अविनाश मेहेर, रेवननाथ मेहेर, गणेश चव्हाण ,व्यंकटेश बुऱ्हाडे अक्षय गणगे. आदी उपस्थित होते.. उपस्थितांचे स्वागत अष्टभुजा ज्वेलर्सचे मनोज बुऱ्हाडे यांनी केलेे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group