करमाळा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी यश कलेक्शनचे मालक सर्वेसर्वा राजकुमार दोशी यांना यशकल्याणी सेवाभावी संस्थेचा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान
करमाळा प्रतिनिधी ग्राहक हाच देवता मानुन करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या मनामध्ये प्रेमाची अतूट नाते निर्माण करणारे शहरातील प्रतिष्ठित व्यापारी राजकुमार दोशी यांनी यश कलेक्शनच्या माध्यमातून उत्तुंग भरारी घेतली आहे. यशकल्याणी सामाजिक संस्थेच्या वतीने यावर्षीचा यशकल्याणी करमाळा उद्योग भूषण पुरस्कार यश कलेक्शनचे सर्वेसर्वा राजकुमार दोशी यांना सहकुटुंब प्रदान करण्यात आला. यावेळी राजकुमार जोशी यांच्या पत्नी सौ अश्विनी वहिनी चिरंजीव यशराज दोशी प्रतीक दोशी दोन्ही सुना नातवंडा सोबत त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. करमाळा येथील यशकल्याणी संस्थेचे प्रेरणास्थान श्रध्देय वसंतराव दिवेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रतीवर्षी वसंत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येते. यामध्ये ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धाचे पारितोषिक वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना गौरविण्यात करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांच्य मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमा सुत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले तर आभार प्रा. कल्याणराव साळुंके यांनी मानले.यश कलेक्शनचे मालक राजकुमार दोशी यांना उद्योग रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.


