यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विजयश्री सभागृहामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . या अभिवादनाच्या कार्यक्रमाचे ऑनलाईन ही ऑफलाईन आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूगोल विभागाच्या प्रमुख डॉ. लेफ्टनंट विजया गायकवाड या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रदिप मोहिते यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवन व कार्याविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली . तसेच प्रा.सुरेशा जाधव यांनी सावित्रीबाईच्या संघर्षमय जीवनाची व मुलीच्या सद्यपरस्थितीची माहिती दिली . सदर कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनीं मोठया संख्येने उपस्थित होत्या .या कार्यक्रमांचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा.कु.सरला चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. अनिता साठे यांनी केले . या कार्यक्रमांचे आभार डॉ. सौ.सपनाराणी रामटेके यांनी मानले . सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते .
