स्व.दिंगबरराव बागल यांचे जुने सहकारी विलास नरसाळे यांचा बागल गटात प्रवेश
करमाळा प्रतिनिधी मांगी येथील लोकनेते स्व दिगंबररावजी मामा बागल यांचे जुने सहकारी विलास (बापू) नरसाळे यांनी बागल गटामध्ये जाहीर प्रवेश केला. तालुक्याच्या स्वाभिमानी नेत्या रश्मी दिदी बागल आणि श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिग्विजय भैय्या बागल यांच्या नेतृत्वाखालील आपण काम करणार असल्याचे बापू नरसाळे म्हणाले. या प्रवेशावेळी तालुक्याच्या स्वाभिमानी नेत्या रश्मी दिदी बागल, मांगी गावचे उपसरपंच नवनाथ भाऊ बागल, अमित भैय्या बागल, राजेंद्र आबा बागल, पद्माकर संचेती, राजेंद्र काका बागल, तात्यासाहेब शिंदे, किरण बागल, नितीन नरसाळे उपस्थित होते.
