Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

यशकल्याणी परिवाराचे अध्यक्ष गणेश करे-पाटील राज्यस्तरीय आदर्श शैक्षणिक उपक्रमशील सेवा पुरस्काराने सन्मानित…

करमाळा प्रतिनिधी  मोहोळ येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघ,सोलापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळेस यशकल्याणीचे गणेश करे-पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श शैक्षणिक उपक्रमशील सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार पुणे शिक्षक संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळेस बोलताना करे-पाटील म्हणाले की पुरस्कार माणसांना काम करण्यासाठी बळ पुरवतात,पुरस्कार चांगल्या कामाच फळ असतं. ज्यांच्या शब्दांनी माणसांना जगण्याची किंमत आणि हिंमत मिळते अशा व्यक्तिमत्त्वाकडून पुरस्कार मिळणे हि गौरवाची बाब आहे.आमच्या सेवेची दखल घेतल्याबद्दल निवड समितीचे करे-पाटील यांनी जाहिर आभार मानले.    यावेळेस व्यासपीठावर मा.श्री.संतोषजी निकम साहेब,कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस स्टेशनचे श्री.अशोक सायकर साहेब,अंकुश आतकर सर,प्रभाकर भैय्या देशमुख वसंतराव कांबळे सर, सुहास कांबळे साहेब,दिलीप (बापू) धोत्रे,संतोष (दादा) गायकवाड श्री. बापूसाहेब आडसूळ सर श्री.दत्तात्रय ननवरे सर श्री. मोहन आयवळे सर श्री.हरिश्चंद्र गाडेकर सर आणि पांडुरंग भगत सर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group