Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी प्रशांत कटारे यांची तर कार्याध्यक्षपदी परशुराम कोकणे यांची शहरसचिवपदी रामकृष्ण लांबतुरे महेश हनमे यांची निवड

 

सोलापूर प्रतिनीधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी सिंहासन डिजिटल मीडियाचे संपादक प्रशांत कटारे यांची तर कार्याध्यक्षपदी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांची निवड करण्यात आली आहे.डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोलापूर शहराचे नवीन पदाधिकारी निवडण्यात आले.डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर शहर सचिवपदी सुराज्य डिजिटल आणि लेमन न्यूजचे संपादक रामकृष्ण लांबतुरे, सोलापूर शहर उपाध्यक्षपदी एमएच 13 न्यूज पोर्टलचे संपादक महेश हणमे यांची निवड करण्यात आली आहे.याप्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष विजय कोरे, सचिव विनोद ननवरे, राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांनी उपस्थित संपादक आणि पत्रकारांना मार्गदर्शन केले. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबतच आता डिजिटल मीडियाही महत्वाची भूमिका बजावत आहे. समाजातील वेगवेगळे प्रश्न डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मांडले जात आहेत. डिजिटल मीडियातील संपादक आणि पत्रकार संघटित राहावेत आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन पातळीवर एकत्रितपणे पाठपुरावा करता यावा यासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे श्री. माने यांनी सांगितले.डिजिटल मीडियामधील सर्व संपादक, पत्रकारांना एकत्रित करून संघटनेचे बळ वाढवण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.संघटनेचे संस्थापक राजा माने, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहराची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे शहराध्यक्ष प्रशांत कटारे यांनी कळविले आहे. डिजिटल मीडियातील ज्या संपादक पत्रकारांना संघटनेत सहभागी होऊन कार्यकारणीत काम करण्याची इच्छा असेल त्यांनी संघटनेशी संपर्क करण्याचे आवाहनही श्री. कटारे यांनी केले आहे.या बैठकीला सिद्धेश्वर माने सागर इंगोले धैर्यशील सुर्वे, रवि ढोबळे, मुकुंद उकरंडे, रत्नदीप सोनवणे, सटवाजी कोकणे, विनोद ननवरे, दिनेश मडके, मोहसीन मुलाणी, विजयकुमार कांबळे, अर्जुन गोडगे, सचिन जाधव, पोपट इंगोले उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group