Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळाक्रिडा

मी माझ्या वडीलांमुळे घडलो-आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश जाधव.

जेऊर प्रतिनिधी. नुकताच अर्जुन पुरस्कार मिळालेले ,सुयश जाधव यांचा सत्कार जेऊर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय जेऊर येथे मा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना सुयश जाधव म्हणाले, मी दिव्यांग असताना मला जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारे व पूर्णतः सहकार्य करणारे माझे वडील आहेत.त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू होण्यामागे मला प्रेरीत करणारे माझे वडील आहेत. व मी माझ्या वडीलांमुळे घडलो.”
यावेळी करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे अतुल भाऊ पाटीलआदींनी मनोगत व्यक्त केले.
“घराघरात एक मुलगा देशाचं नाव उंचावर नेणारा असवा.आपल्या मुलांवर चांगले संस्कार द्या. सुयश जाधव यांना यश लाभो ,अश्या शुभेच्या मा आमदार नारायण आबा पाटील यांनी
दिल्या.यावेळी या कार्यक्रमासाठी , गहिनीनाथ ननवरे करमाळा सभापती, ,उपसभापती दत्तात्रय सरडे, मा सभापती शेखर तात्या गाडे,अतुल भाऊ पाटील,पं .स सदस्य , सुनील तळेकर मा सदस्य , तसेच जेऊर चे सरपंच उपसरपंच ,व सदस्य उपस्थित होते सत्कार मूर्ती सुयश जाधव ,नारायण जाधव , आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद गरड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष वाघमोडे,धनंजय शिरस्कर आदींनी परिश्रम घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group