शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी
करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आई कमला भवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे . जगदंबा देवी ट्रस्टच्या वतीने मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या नवरात्र उत्सवाची सुरुवात सोमवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ट्रस्टच्या वतीने विधिवत घटस्थापना होऊन होणार आहे या नवरात्र उत्सवामध्ये देवीची दररोज वेगवेगळे आकर्षक रंगांचे शालू घालून पूजा मांडण्यात येणार आहे अशी माहिती मंदिर देवस्थानचे पुजारी श्री दादासाहेब पुजारी यांनी दिली या शारदीय नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये दररोज देवीची सकाळी नऊ व रात्री नऊ वाजता देवी पंचायतन आरती होणार आहे.आलेल्या सर्व देवी भक्तांसाठी श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत तसेच सर्व भक्तांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे अशी माहिती सरपंच महेश सोरटे यांनी दिली. कोरोना नंतर या वर्षी प्रथमच मंदिर परिसरामध्ये अन्नछत्र सुरू होत आहे तसेच खेळणी विक्रेते मिठाई व खाद्यपदार्थ विक्रेते तसेच मोठे व छोटे पाळणे यांना परवानगी देण्यात आलेली आहे ही बच्चे कंपनीसाठी एक मेजवानीच असणार आहे.
