Tuesday, April 22, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळा

करमाळ्याची कुलस्वामिनी  आई कमलाभवानी मातेचा नवरात्र उत्सव कोरोनानंतर यंदा मोठ्या उत्साहात करण्याची जोरदार तयारी                       

 करमाळयाची कुलस्वामिनी  कमलाईचा नवरात्र उत्सव कोरोना नंतर यंदा मोठ्या उत्सहात होणार आहे. भक्ती भावाने पाहण्यास मिळणार आहे. ९६ कुळाचा उद्धार करणाऱ्या करमाळा तालुक्यातील या आई कमला भवानी मातेचा नवरात्र उत्सव भाविक भक्तांना पहाता येणार आहे. या उत्सवाचे नियोजन श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायत व कमलाभवानी ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात येत आहे.

तालुक्यातील गावा- गावातून, वाडी वस्तीवरून येथे लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. या उत्सवाला सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित राहतात. नवरात्रीच्या काळात करमाळा शहर व तालुक्यातील भाविक भक्त, करमाळा शहरातील मुस्लिम बांधव मांसाहारीची दुकाने पूर्ण नऊ दिवस बंद ठेवतात. नऊ दिवस नवरात्रीचे उपवास असतात. त्यानिमित्ताने श्रीदेवीचा माळ येथील जगदंबा देवी अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने भाविकांना मोफत उपवासाचे पदार्थ वाटप करतात.श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायतच्या वतीने सर्व उपाययोजना करण्यात आले आहेत. नवरात्री काळात लाईट, पाणी, दिवाबत्तीचे नियोजन करण्यात येणार आहे. या उत्सवाला पर राज्यातून, पर जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून व्यवसायिक व विक्रेते यांचे आगमन झाले आहे. या उत्सवासाठी खेळणीवाले, पाळणेवाले, स्टेशनरी, सौंदर्यप्रसाधनाची दुकाने थाटणार आहेत. खाद्यपदार्थ खाद्यपदार्थांचे विक्री स्टॉल उभारणार आहेत. हा उत्सव करमाळा शहर तालुक्यात भक्ती भावाने व आनंदाने साजरा होतो. मंदिरावर वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे तसेच लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी मोठ्या- मोठ्या प्रकारचे उंच पाळणे याचे नियोजन ९६ पायऱ्यांच्या विहिरीजवळ केले आहे. येथेही लाईट दिवाबत्तीची सोय केली आहे. सर्व व्यवसायिकांना सर्व प्रकारचे सहकार्य ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येणार आहे.

श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच महेश सोरटे, उपसरपंच दीपक थोरबोले, ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण, संतोष पवार, सचिन शिंदे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन चोरमले, ग्रामपंचायत कर्मचारी, देवस्थानचे पुजारी, ट्रस्ट व्यवस्थापन समिती, कमलाभवानी मंदिरातील मानाचे मानकरी माजी सरपंच दादासाहेब पुजारी, बाळासाहेब सोरटे, नारायण सोरटे कमलाकर सोरटे, पंडित सोरटे, मंदिरातील विश्वस्त व मानकरी इंताज रोशन शेख, बबन दिवटे, विलास डबडे, ईश्वर पवार, राजेंद्र सूर्यपुजारी, पद्माकर सूर्यपुजारी, सनी पुराणिक, श्रीकांत गोमे, राजेंद्र शिंदे, मोहन शिंदे, हनुमंत पवार, बापूसाहेब पुजारी, गोंधळी समाजाचे प्रमोद गायकवाड, सतीश थोरबोले, दीपक थोरबोले, अशोक थोरबोले व सर्व मानकरी आपली सेवा अर्पण करतात.

फुलारी परिवाराकडून नवरात्र उत्सवकाळात फुलांचे हार व फुलेमाळ घालण्यासाठी उपलब्ध करतात. राजेंद्र फलफले विजय पुजारी, बापू चांदगुडे, प्रभाकर धोंडे, दिलीप चव्हाण, विजय चव्हाण, अर्जुन चव्हाण, सतीश अनभुले, नागेश अनभुले, श्रीराम फलफले, अभिमान पवार, योगेश सोरटे, अक्षय सोरटे, ओंकार पुजारी, महेश कवादे, पै प्रशांत पवार, नाना बिडवे, शिवशंकर बिडवे, राजेंद्र बिडवे, शेखर पवार व सतीश अनभुले यांच्यासह अनेक भक्त उत्सव यशस्वी व्हावा म्हणून परिश्रम घेत असतात.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group