नवीन बांधकाम कामगारांची एक सप्टेंबर रोजी करमाळ्यात नोंदणी जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार-ज्योतीताई वाघमारे
करमाळा( प्रतिनिधी )
रविवार एक सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून अमरनाथ टावर देवीचा मार्ग रोड येथे बांधकाम कामगारांची नोंदणी कार्यक्रम आयोजित केला असूननवीन नोंदणी कामगारांसाठी सर्व कागदपत्र घेऊन कामगारांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना महिला आघाडी ज्योतीताई शिंदे यांनी केले आहे.
-उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे
शहर प्रमुख संजय अप्पा शीलवंतयुवा सेनेचे तालुकाप्रमुख नवनाथ गुंडजेऊर शहर प्रमुख माधव सूर्यवंशी,ओबीसी शिवसेना आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुयश करचे,वैद्यकीय कक्ष प्रमुख नागेश चेंडगे,जेऊर शाखाप्रमुख संजय जगताप निलेश चव्हाण राजेंद्र मिरगळ उपतालुकाप्रमुख दादासाहेब तनपुरे जेऊर शहर प्रमुख दादा थोरात आधीच जास्तीत जास्त नोंदणी कामगार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.नवीन बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स इंजिनीयर किंवा कंत्राटदाराचा कामावर असल्याचा दाखला अधिक कागदपत्र घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन करमाळा शहर प्रमुख संजय शिलवंत यांनी केले आहे.
