Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यातील राजुरीमध्ये नारायण पाटील गटाला खिंडार; अनेक कार्यकर्ते संजयमामा शिंदे गटात दाखल.


करमाळा प्रतिनिधी
राजुरी, ता. करमाळा येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी नारायण आबा पाटील गटाला रामराम करून आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.आज दुपारी निमगाव येथील संजयमामा शिंदे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत.याशिवाय राजुरी साठी स्वतंत्र सबस्टेशन, उजनी कुकडी उपसा सिंचन योजना, व नुकताच हॅम अंतर्गत मंजूर झालेला सावडी ते वेणेगाव फाटा हा मार्ग यामुळे राजुरी गावाच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असून मामांच्या कामाने प्रभावित होऊन आम्ही आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले .
यावेळी मा.उपसरपंच भाऊसाहेब जाधव, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बापू गायकवाड, छगन जाधव, माजी उपसरपंच धनंजय जाधव, योगेश जाधव ,दादा जाधव,राजुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य बाळासाहेब पवार, वस्ताद गौतम गरुड, मगनदास जाधव, अण्णा जाधव ,शहाजी जाधव, भागवत शिंदे या सर्व कार्यकर्त्यांनी माजी आमदार नारायण आबा पाटील गटातून संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.
यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धवदादा माळी, आर. आर. बापू साखरे, नंदकुमार जगताप, राजुरी चे माजी सरपंच संजू तात्या सारंगकर, सुनील पाटील,उदय साखरे, नामदेव जाधव, नवनाथ दुरंदे,दादा बापू साखरे,आत्तम दुरंदे, मल्हारी दुरंदे,आकाश झोळ, संकेत अवघडे, आप्पासाहेब साखरे, तुषार मोरे, सचिन सराटे, सोमनाथ धुमाळ आदी उपस्थित होते .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group