*शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली फिसरे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला*
करमाळा प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी करमाळा तालुक्यातील फिसरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये या ग्रामपंचायतीवर सहा जागी दणदणीत विजय मिळवला असुन यावेळी प्रथमच गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देऊन शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना सहा जागी व बागल गटाने एक जागेवर विजय मिळवला असुन 6 विरूद्ध एक अशा फरकाने बहुमत मिळवले आहे. यामध्ये वार्ड क्रमांक 1. वैशाली गणेश ढावरे 2.पल्लवी प्रशांत नेटके 3.लता ज्ञानदेव नेटके .वॉर्ड क्रमांक 2.1.हनुमंत रामभाऊ रोकडे.2. राधा विजय आवताडे .वॉर्ड क्रमांक3.1प्रदीप आंकुश दौंडे यांचा विजयी उमेदवारांचा समावेश आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत भाऊ आवताडे यांनी फिसरे ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला असुन याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
