करमाळा

ऋणानुबंध फाऊंडेशन घोटी यांच्या वतीने  16 ऑगस्ट रोजी स्नेह सम्मेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी ऋणानुबंध फाऊंडेशन घोटी यांच्या वतीने  16 ऑगस्ट रोजी आयोजित स्नेह सम्मेलन कार्य क्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम महादेव मंदिर घोटी येथे सरपंच श्री विलास राऊत-पाटील यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव श्री मनोज राऊत साहेब विशेष उपस्थिती उपसंचालक सारिका ताई ननवरे मुंबई होत्या.प्रास्ताविक ऋणानुबंध फाऊंडेशन चे सचिव अनिल थोरात यांनी केले. त्यांनी फाऊंडेशन चे उद्देश, तसेच शैक्षणिक ,सामाजिक कार्य करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. त्याचबरोबर 50 वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले. श्री मनोज राऊत साहेब यांनी पर्यावरण चे महत्व व स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. सौ सारिका ताई ननवरे मुंबई यांनी घोटी गावासाठी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करणार आणि अध्यक्ष विलास राऊत-पाटिल यांनी स्वतः 5 वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. आभार प्रदर्शन ऋणानुबंध फाऊंडेशन च्या अध्यक्षा जयश्री ताई घाडगे यांनी केले.सुत्रसंचालन भारत जाधव यांनी केले.
डॉक्टर रेवणनाथ पाटील यांचे वतीने सर्वांना भोजनाची व्यवस्था केली होती. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर दुधे गुरुजी,प्रकाश बलदोटा,मिरा सिडस् चे संचालक अजितसिंह राऊत साहेब, अंबादास खरात,बाबासाहेब थोरात, हिराजी राऊत, वैशाली ताई ननवरे, अनिल थोरात, तुषार राऊत,शैलजा ताई इत्यादी उपस्थित होते

error: Don\'t try to copy. Content is protected !!