Thursday, August 6, 2026
Latest:
Uncategorized

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार महिन्यापासून प्रकरणे मंजूर करण्यात आली नाहीत अर्जदार मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत एप्रिल महिन्यापासून ऑनलाइन केलेली सर्व प्रकरणे अर्जदारांना ऑनलाइन सेंटरवरून माघारी घेण्यास सांगितले व ती सर्व प्रकरणे ऑफलाइन तहसील कचेरीमध्ये द्या असे सांगितले संजय गांधी शाखा करमाळा या अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे अर्जदारांना प्रचंड मनस्ताप झाला व तहसील कचेरीचे हेलपाटे मारावे लागले आता अर्जदारांनी ऑफलाईन सर्व अर्ज कचेरीमध्ये दाखल केले आहेत तेव्हा मा. तहसीलदार यांनी या प्रकरणांना 15 ऑगस्ट पर्यंत मंजुरी द्यावी हे सर्व अर्जदार 65 वर्ष पेक्षा जास्त वयस्कर आहेत अपंग आहेत अंध आहेत विधवा आहेत या लोकांना तहसील कचेरीचे हेलपाटे मारने फार अवघड आहे यांचे हाल पाहत नाहीत त्यामुळे ही सर्व प्रकरने तत्काळ मंजूर करावीत 15 ऑगस्ट पर्यंत या प्रकरणांना मंजुरी नाही दिल्यास बहुजन संघर्ष सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी दिला आहे
निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांना देण्यात आले त्याच्या प्रती जिल्हाधिकारी मुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री यांना देण्यात आल्या आहेत
यावेळी आदिनाथ चे संचालक रामेश्वर तळेकर, रामभाऊ नलवडे, महेश पाटील उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!