Friday, August 21, 2026
Latest:
Uncategorized

श्री कमलाभवानी मंदिरात २ हजार महिलांचा दुर्गा सप्तशती पाठ भक्तिमय वातावरणात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा; विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना

करमाळा प्रतिनिधी
श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे भव्य आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यात जवळपास दोन हजार महिला भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्री दुर्गा सप्तशतीचे सामूहिक पठण केले. मंत्रोच्चार, घंटानाद आणि देवीच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
आई जगदंबा कमलादेवीच्या चरणी नतमस्तक होत महिला भाविकांनी अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने दुर्गा सप्तशती पाठाचे पठण केले. सामूहिक पठणामुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. विश्वकल्याण, सुख-शांती, आरोग्य आणि सर्वांच्या मंगलमय जीवनासाठी या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीचे सचिव अनिल पाटील व सौ. ॲड. लता पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करण्यात आली. आरतीच्या वेळी उपस्थित महिला भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला. देवीच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमास मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, विश्वस्त सुशील राठोड, डॉ. रोहन पाटील, राजेंद्र वाशिंबेकर, मंदिराचे पुरोहित श्याम पुराणिक, तसेच पुजारी रत्नदीप पुजारी, रामदास सोरटे, भारत सोरटे, संजय कदम यांच्यासह सौ. कदम, वीर सर, वीर मॅडम आणि मंदिरातील सर्व पुजारी, सेवेकरी व मानकरी उपस्थित होते.
तसेच श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर समिती, पुजारी, सेवेकरी, मानकरी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला.
दुर्गा सप्तशती पाठाच्या निमित्ताने महिला भाविकांनी एकत्रितपणे देवीची आराधना केली. दोन हजारांहून अधिक महिलांच्या सामूहिक पठणामुळे मंदिर परिसराला धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले होते. श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक प्रार्थनेतून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, तसेच सर्वांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विश्वकल्याणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य धार्मिक सोहळ्याला महिला भाविकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!