करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर व्हाइस चेअरमनपदी श्री. निशांत खारगे आणि सचिवपदी श्री. अजित कणसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ही निवड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विष्णू माने यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निबंधक कार्यालयात पार पडली. या निवडीमुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी संस्थेचे संचालक प्रताप काळे, आदिनाथ देवकते, अरुण चौगुले, साईनाथ देवकर, सतीश चिंदे, वैशाली महाजन व पूनम जाधव उपस्थित होते.तसेच प्रविण घाडगे, अमोल राऊत, उमेश कानडे, बाळासाहेब वाघमोडे, लक्ष्मण भंडारे, दयानंद चौधरी, देवेंद्र जाधवर, मारुती ढेरे, संभाजी गोसावी, नितीन व्हटकर, विनोद वारे, चंद्रकांत जाधवर, दादासाहेब बुधवंत, सुधीर चव्हाण, अशोक कणसे, अशोक दुधे, बाळासाहेब दुधे व रमेश नामदे आदी मान्यवर उपस्थित होते.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगती होऊन सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


