Saturday, November 21, 2026
Latest:
Uncategorized

सिव्हिल इंजिनिअर शैलेश खडके यांना मातृ शोक श्रीमती अंजली मधुकर खडके यांचे दुःखद निधन

करमाळा  प्रतिनिधी
करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके यांच्या मातोश्री कै. अंजली मधुकर खडके (वय ८०) यांचे शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. अंजली खडके या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांनी खडके कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गर्दी केली.
त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवारी सायंकाळी ठीक ५ वाजता शिवाजीनगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून, दत्त मंदिराच्या पाठीमागील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात शैलेश खडके यांच्यासह कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने खडके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!