नुकसानग्रस्त कांदा व इतर पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी भाजपा सरचिटणीस अमरजित साळुंखे
करमाळा प्रतिनिधी करमाळा नुकसानग्रस्त कांदा व इतर पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि ई पीक पाहणी कार्यक्रम साठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी भाजपा करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी तहसीलदार समीर माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
करमाळा तालुक्यामध्ये मागील आठ ते दहा दिवसात सतत पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेताला पाणी लागून राहिले असल्याने कांदा व इतर काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी बांधवांचे कोरोनाने मोठया प्रमाणावर नुकसान झाले असताना पावसाने झालेले नुकसान हे शेतकऱ्याचे मानसिक संतुलन ढासळवणारे आहे.
कांदा व इतर नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांना मिळावी, तसेच महसूल विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या ई-पीक पाहणी कार्यक्रम सुरू आहे, त्यानुसार शेतकऱ्यांनी मोबाईल द्वारे आपल्या पिकाची नोंदणी ही स्वतः करायची आहे. आपला सर्वच शेतकरी बांधव हा मोबाईल अँप्लिकेशन वापरासाठी प्रशिक्षित नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. महसूल विभागाच्या वतीने गाव पातळीवरील विविध यंत्रणा कार्यान्वीत आहेतच तरी देखील सदरचे कामकाज प्रभावीपणे राबविण्यासाठी व पिकपाण्याची योग्य नोंद होण्यासाठी आणखीन मुदतवाढ देण्यात यावी, अशी करमाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करमाळा तहसीलदार श्री. समीर माने यांना निवेदन देऊन करण्यात आली. चर्चे दरम्यान तहसीलदार श्री माने म्हणाले की शेतकरी बांधवांनी प्रत्यक्ष पीक जे असेल तेच नोंदवून सहकार्य करावे, पिकांचा शेतसारा हा वार्षिक असून खूपच कमी असतो अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी पिकपाण्याची नोंद करावी याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण, शहर अध्यक्ष जगदीश आगरवाल, संजय गांधी योजनेचे नरेंद्रसिंह ठाकूर, आबासाहेब टापरे, सचिन चव्हाण, संजय जमदाडे, दत्तात्रय पानसरे,नागनाथ केकान,मनोज राखुंडे अनिल नरसाळे, अशोक पोळके, सूर्यकांत रायकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.
