करमाळाकृषी

दसरा सणानिमित्त राजुरी ग्रामपंचायतीच्यावतीने अनुसूचित जातीच्या कुटुंबाना संसार उपयोगी साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी दसऱ्याच्या सणानिमित्त आज राजुरी ग्रामपंचायत कडून अनुसूचित जमातीमधील भिल्ल महादेव कोळी या कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात आले, 15% मागासवर्गीय ग्रामनिधीतून या वस्तूंचे वाटप करण्यात आले,एकूण 18 कुटुंबाना याचा लाभ मिळाला.यातील बरीचशी कुटुंब ऊस तोडी निमित्त दसऱ्यानंतर परगावी जातात त्यामुळे या संसार उपयोगी साहित्याचा उपयोग त्यांना होणार आहे. राजुरीमधील अनुसूचित जमाती या भूमिहीन आहेत, त्यामुळे शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे, तसेच या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हा यामागचा हेतू आहे असे म्हणणे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे यांनी मांडले. यावेळी ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, उपसरपंच धनंजय जाधव, बंडू शिंदे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य कैलास साखरे, भानुदास साखरे ,राजेंद्र भोसले,बंडू टापरे,कल्याण दुरंदे, परसूराम मोरे उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group