बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांचे कृर्षी उत्पन बाजार समितीचे संचालकपद कायम बागल गटात आंनदोत्सव
करमाळा प्रतिनिधी बागल गटाचे युवा नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री दिग्विजय भैय्या बागल यांचे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक पद रद्द करण्यात आले होते. रद्द केलेले करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद आता परत कायम करण्यात आले आहे. दिग्विजय बागल यांचे संचालकपद कायम राहिल्याने बागल गटात मोठा उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्यामुळेच हे संचालक पद कायम राहिले असल्याचे सांगितले जात आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विकण्यासाठी येणाऱ्या व माल घेऊन येणाऱ्या वाहनांची प्रवेश फी माफ करण्यासारखे इतर अनेक महत्त्वपूर्ण व शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय बागल यांच्या नेतृत्वात बाजार समितीमध्ये घेण्यात आले होते. पुढील काळामध्ये बागल गटाची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची कामे करण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, असे बागल गटाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
