Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांच्यावतीने 7ॲागस्ट रोजी बांधकाम कामगार नोंदणीचा सर्वांनी लाभ घ्यावा -गणेश चिवटे

करमाळा प्रतिनिधी – श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने सोमवार दिनांक ०७/०८/२०२३रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय, पुणे रोड, गायकवाड चौक करमाळा येथे बांधकाम कामगार नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे , या मेळाव्यात बांधकाम कामगारांची मोफत नोंदणी केली जाणार आहे, सध्या बांधकाम कामगारांना ऑनलाइन नोंदणीसाठी अडचणी येत असून बांधकाम कामगारांच्या सोयीसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली आहे, तसेच या नोंदणी मेळाव्यासाठी सोलापूर येथील शासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून या नोंदणी मेळाव्याचा जास्तीत -जास्त लाभ बांधकाम कामगार बांधवांनी घ्यावा असे आव्हानही त्यांनी केले आहे,

error: Don\'t try to copy. Content is protected !!