Saturday, April 4, 2026
Latest:
करमाळा

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी आरोपीस अटक करून आरोपीचे ताब्यातुन 78,000/- रूपयाचा आय फोन 15 प्लस मोबाईल व दुस-या चोरीतील सोन्याचा गणपती असलेला पदक असा मुद्देमाल हस्तगत

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी आरोपीस अटक करून आरोपीचे ताब्यातुन 78,000/- रूपयाचा आय फोन 15 प्लस मोबाईल व दुस-या चोरीतील सोन्याचा गणपती असलेला पदक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

घटना क्र. 01 –

यात हकीकत अशी की दि. 09/07/2025 रोजी दुपारी 02/30 वाचे सुमारास फिर्यादी निशांत ईचर कांबळे वय 25 वर्षे रा मिलीद नगर एम.आय.डी.सी. ता/जि धाराशिव हे पुणे येथुन धाराशिव कडे जात असताना दोन अनोळखी इसम जवळ येऊन आमच्या कडे जुने सोने आहे आम्हाला पैशाची गरज आहे ते आम्हाला विकुन द्या आमचेकडुन कोणी घेत नाही आमची नावे अमोल काळे व आरकिसन काळे रा. पोमलवाडी ता करमाळा असे सांगुन फिर्यादीस पुणे रेल्वे स्टेशन येथुन पारेवाडी ता करमाळा रेल्वे स्टेशन येथे घेऊन आले व आमचे घरी सोने आहे असे सांगुन पारेवाडी येथून चालत एका शेतात घेऊन गेले व दोन्ही आरोपीनी फिर्यादीस हाताने मारहाण करून त्याचेकडील 78,000/- रू किमतीचा आय. फोन 15 प्लस मोबाईल फोन जबरदस्तीने काढुन घेतला व तेथुन दोन्ही आरोपी पळुन गेले अशा आशयाची हकिकत सांगत असल्याने करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं 551/2025 भारतीय न्यांय संहिता कलम 309 (6), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

सदर फिर्यादिचे अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी लागलीच पथक तयार करून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना योग्य त्या सुचना देऊन गुन्हो तपासाच्या अनुषांगाने जिंती दुरक्षेत्र हद्दीत रवाना केले. रवाना झालेल्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर आरोपी हे आपली ओळख लपवुन पारेवाडी शिवारातील शेतात लपले आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ योग्य असा सापळा लावुन आरोपी पकडले. त्यानंतर त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याची नावे 1) अमोल लाला काळे वय 24 वर्षे 2) आरकिसन लाला काळे वय 26 वर्षे रा. पोमलवाडी ता करमाळा जि. सोलापुर असे सांगितले त्यावेळी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणले असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिला पंरतु त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषगाने आधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांनी निवेदन पंचनामा करणेस निवेदन दिल्याने गुन्ह्यातील 78,000/- रूपये किमतीचा आय. फोन 15 प्लस मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोसई / बनकर हे करत आहेत.

1) आरोपी नामे अमोल लाला काळे वय 24 वर्षे रा. पोमलवाडी ता करमाळा जि. सोलापुर यावर दाखल असलेले गुन्हे

1) करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं 88/2018 भा.द.वि. कलम 439,399,402.

2) करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं 547/2019 भा.द.वि. कलम 399,402.

3) कर्जत पोलीस ठाणे ठाणे गु.र.नं 08/2019 भा.द.वि. कलम 379

4) श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.र.नं 233/2021 भा.द.वि. कलम 379

2) आरोपी नामे आरकिसन लाला काळे वय 26 वर्षे रा. पोमलवाडी ता करमाळा जि. सोलापुर यावर दाखल असलेले गुन्हे

1) करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं 547/2019 भा.द.वि. कलम 399,402.

2) करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं 295/2016 भा.द. वि. कलम 395,377,396.

3) करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं 231/2016 भा.द.वि. कलम 395,397,527,406,

4) करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं 453/2018 भा.द.वि. कलम 457,380,34.
[7/15, 16:56] Dinesh Madake: दुपारी 03/00 वाचे सुमारास फिर्यादी संतोष शिवाजी पवार वय 49 वर्षे रा शिगुर ता कर्जत जि. आहिल्यानगर हे आपल्या नातवासह करमाळा येथे आठवडा बाजार व कपडे खरेदी करण्यासाठी करमाळा येथे आले असता फिर्यादीचा नात वैष्णवी महेश पवार वय 03 वर्षे हिचे गळ्यातील काळ्या गोप मध्ये सोन्याचा गणपती असलेला पदक अनोळखी इसमाने कशाचे तरी साहाय्याने तोडुन फिर्यादीच्या संमती वाचुन चोरून नेला आहे व आरोपी पळून गेले अशा आशयाची हकिकत सांगत असल्याने करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं 554/2025 भारतीय न्यांय संहिता कलम 303(2),3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदर फिर्यादिचे अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी लागलीच C.C.T.V. पाहण्यासाठी व तपास करण्यासाठी 03 पथके तयार करून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना योग्य त्या सुचना देऊन गुन्हो तपासाच्या अनुषांगाने शहर हद्दीत रवाना केले. C.C.T.V. व्हिडीओ आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर आरोपी हा खांबेवाडी कडुन घारगाव कडे जात असल्याची अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ योग्य असा सापळा लावुन आरोपीस पकडले. त्यानंतर त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याची नावे 1) युवराज आण्णा पवार वय 34 वर्षे रा. घारगाव ता करमाळा जि. सोलापुर असे सांगितले त्यावेळी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणले असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिला पंरतु त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अंनुषगाने आधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांनी निवेदन पंचनामा करणेस निवेदन दिल्याने गुन्ह्यातील 5,200/- रूपये किंमतीचा सोन्याचा गणपती असलेला पदक जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/375 अरकिले हे करत आहेत.सदरची कामगिरी ही श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, पोसई संदिप बनकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ / 1648 अजित उबाळे, पोना 1162 मनिष पवार, पोना/912 वैभव ठेंगल, पोकों 856 अर्जुन गोसावी, पोकाँ/1142 स्वप्नील शेरखाने, पोकॉ/438 रविराज गटकुळ, पोकॉ/1524 अमोल रंदिल, पोकॉ/689 योगेश येवले, पोकॉ/168 मिलीद दहिहांडे, पोकॉ/961 गणेश खोटे तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोहेकॉ / 222 व्यकंटेश मोरे यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!