दीपावली पाडव्याच्या निमित्ताने कमलाभवानी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाअभिषेक संपन्न
करमाळा प्रतिनिधी : दीपावली पाडव्याच्या पावन निमित्ताने करमाळा येथील श्री कमलाभवानी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाअभिषेक मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.करमाळा शहरातील प्रमुख मान्यवर बाळासाहेब देशमुख, नगरसेवक सचिन गायकवाड, इतिहास संशोधक संग्राम परदेशी, ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक व संचालक प्रा. डॉ. महेश निकत तसेच YCM कॉलेजचे प्रा. लक्ष्मण राख यांच्या शुभहस्ते महाराजांचा महाअभिषेक करण्यात आला. रविराज पुराणिक यांनी विधिवत पूजा संपन्न केली.यावेळी मंदिराचे ट्रस्टी, पुजारी, ग्रामस्थ तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.या निमित्ताने आज सायंकाळी ठीक ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच रात्री ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होणार आहे.या दीपोत्सव व आरती सोहळ्यास सर्व शिवप्रेमी, भाविक भक्त आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजेराव रंभा अन्नदान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


