Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सर्व गटातटांनी पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून आदिनाथ वाचण्यासाठी महायुतीला साथ द्यावी-महेश चिवटे

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सर्व गटातटांनी पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून आदिनाथ वाचण्यासाठी महायुतीला साथ द्यावी असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांनी व्यक्त केले. आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे महेश दादा ऊ यांनी 17 मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी अमोल भोसले सहाय्यक निवडणूक अधिकारी सौ. शिल्पाताई ठोकडे यांच्याकडे ओबीसी प्रवर्गामधून उमेदवारी अर्ज दाखल केला केला आहे. यावेळी नासीरभाई कबीर अशोक नरसाळे उपस्थित होते.महेश दादा चिवटे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे प्रशासकीय संचालक म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना कर्जाच्या विळख्यात सापडला असून 200 ते 250 कोटी या कारखान्यावर कर्ज आहे हा कारखाना कर्जमुक्त करून शेतकरी सभासदांना न्याय देण्यासाठी आदिनाथ कारखाना वाचवणे हे आपले कर्तव्य असून करमाळा तालुक्यातील सर्व गटातटाच्या नेत्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून भूमिपुत्र नात्याने आदिनाथ सहकारी वाचवण्यासाठी सहकार्याची भूमिका बजावणे गरजेचे आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांच्या माध्यमातून आदिनाथ कारखाना गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी 200 ते 250 कोटी रुपये सहकार्य मिळणे अपेक्षित असून महायुतीच्या माध्यमातून ते नक्कीच मदत करतील व आदिनाथ कारखाना नक्कीच गत वैभव प्राप्त करेल असा आपला विश्वास असून शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट यांच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारत घेऊन आपण लवकरच शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांची भेट घेऊन त्यांनी कारखान्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका व पाठबळ दिल्यास आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूकसर्वांना बरोबर घेऊन लढवणार असल्याचे आदिनाथ सहकार साखर कारखान्याचे माजी प्रशासकीय संचालक महेश दादा चिवटे यांनी व्यक्त केले आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group