करमाळाराजकीयसकारात्मकसामाजिक

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले महाराष्ट्रातील धनगर समाजबांधवाच्या विविध प्रमुख मागण्याचे निवेदन‌

अकलुज प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे *उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आ.श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील* यांनी विधान मंडळात भेट घेवुन महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन दिले आहे. राज्यातील धनगर समाजातील महिला बंदिस्त सहकारी संस्थांना विशेषत: विदर्भ, उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद, सोलापूर व सांगली जिल्ह्यात मेंढपाळ महिला भटकंती करतात ही भटकंती बंद होण्याकरिता महिलांना घरच्या घरी बंदिस्त मेंढपाळ उद्योग निर्माण होण्याबाबत शासनामार्फत बंदिस्त शेळी व मेंढी पालन सहकारी संस्थांना बहुजन विभागाकडून प्रायोगिक तत्वावर संस्थांना आर्थिक निधी मंजुर करावा.
पारंपारीक धनगरी गजनृत्य करणाऱ्या कलाकारास शासनाकडून प्रतिमहा २०००/- रुपये मानधन मिळणेबाबत.
पारंपारीक ढोल, डपडे, शिंगाडे, सुर, पिपाणी वाद्य वाजविणाऱ्या कलाकारांना महाराष्ट्र शासनाकडून
प्रतिमहा ५०००/- रुपये मानधन देण्यात यावे
पारंपारीक लोककला धनगरी ओव्या गायकास व त्यांच्या सोबतच्या वाद्य वाजंत्र्यास दरमहा रुपये ५०००/- मानधन मिळावे.धनगर समाजाची शेकडो वर्षापासून पारंपारीक कला जोपासण्यासाठी या कलाकारांना रोजीरोटी मिळवून देण्यात यावी व ही कला जिवंत ठेवण्यासाठी तसेच धनगर समाजातील आर्थिक सक्षम करण्यासाठी बहुजन विकास, मागास विभागामार्फत धनगर समाजाच्या मागण्या मान्य करणेबाबत सहकार्य करावे अशी विनंती आमदार मा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group