सामाजिक कार्यासाठी तत्पर असलेले घारगाव येथील सरवदे कुटुंब
घारगाव प्रतिनिधी सामाजिक कार्यासाठी तत्पर असलेले घारगाव येथील सरवदे कुटुंब असुन अनावश्यक खर्च टाळून मुलाच्या वाढदिवसानिमित्त स्व.वेदप्रकाश लच्छीराम गोयल निवासी मतिमंद विद्यालय येथे सरवदे कुटुंबाकडून शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने आपला मुलगा देखील ५०% अस्थिव्यंग आहे. त्याची इच्छा होती की, माझ्याकडून देखील काहीतरी मूकबधिर मतिमंद बांधवांना शैक्षणिक मदत व्हावी. म्हणून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मूकबधिर मतिमंद निवासी विद्यालय फुलगाव ता. हवेली जि. पुणे या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ( *सचित्र बालमित्र, अक्षर उजळणी, वह्या पुस्तके*) शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप केले समाज कार्यामध्ये सरवदे कुटुंब हे समाजकार्यात व शिक्षणाच्या बाबतीत सतत मदत करीत असते. त्यामुळे शाळेच्या वतीने सरवदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने वह्या व पुस्तके भेट देत सामाजिक उपक्रम राबवण्यातआला. इतरांनीही असेच अनुकरण करावे व मतिमंद, मूक बधिर, अस्थिव्यंग बांधवांना सहकार्य करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे यांनी केले.यावेळी सागर कट्यारमल सर मुख्याध्यापक , श्री संजय सरवदे ,सौ.लक्ष्मी सरवदे (ग्रामपंचायत सदस्य घारगाव) व गोपाळ बानोले ,प्रवीण नांगरे, लक्ष्मण नांगरे, प्रज्वल अभ्यंकर शिक्षकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते.
