सोलापूर, टेंभुर्णी.वांशिबे या मार्गावर करमाळा आगाराची बस सेवा 6 ॲागस्ट पासून सुरू-घोलप

करमाळा प्रतिनिधी
दिनांक 06/08/2020 पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या करमाळा आगाराची बस सेवा सोलापूर,टेम्भुर्णी , वाशिंबे या मार्गावर सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून आता जिल्हा अंतर्गत वाहतुकीची सुरुवात झाली आहे.त्यासाठी बसेस मार्गावर देण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. यात प्रामुख्याने प्रवाशानी मास्क वापरणे. तसेच सॅनीटाईझर चा वापर करणे क्रमप्राप्त आहे. तसेच सोशल डिस्टनसिंग चे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी एका बाकड्यावर एक असे जास्तीतजास्त 22 प्रवासी एका बस मधून प्रवास करू शकतील.म्हणजेच एकूण प्रवाशी क्षमतेच्या 50% प्रवाशाना प्रवास करता येईल. ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षांखालील मुलांना प्रवास करता येणार नाही.( अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून)वरील अटी व शर्तींचे पालन करून कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रवाशांनी महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन विजयकुमार घोलप यांनी केले आहे.
