माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह निंबाळकर दोन लाख मतांनी विजयी होणार -संजय मशीलकर
करमाळा प्रतिनिधी
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाख मतांनी विजयी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांच्या आदेशानुसार माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक कामाला लागले आहेत.खासदार निंबाळकर हे शिवसेनेचेच उमेदवार आहेत असे समजून शिवसैनिकांनी काम करावी असे आव्हान शिवसेनेचे संपर्क नेते तथा माढा सोलापूर शिरूर मावळ पुणे या पाच लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी संजय मशिनकर यांनी केले.माढा लोकसभा मतदारसंघात त्यांनी 10 ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या.मोडनिंब माढा कुर्डूवाडी पंढरपूर माळशिरस नातेपुते सह युवा सेना महिला आघाडी आधी पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्याया सर्व बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी त्यांच्या समवेत सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजी चरण चौरे लक्ष्मीकांत ठोंगे पाटील महेश चिवटे युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे मा. महापौर दिलीप कोल्हेसोलापूर शहर प्रमुख मनोज शेजवाल अक्कलकोट तालुकाप्रमुख महेश देशमुख,माढा तालुका प्रमुख वैभव मोरे कुडुर्वाडी शहर प्रमुख समाधान दास करमाळा विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील करमाळा शहर प्रमुख संजय शीलवंत युवा सेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबरयुवती सेना अध्यक्ष प्रियंका पराडे पाटील,महिला संपर्कप्रमुख माळगे मॅडमआधी पदाधिकारी उपस्थित होते
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी समन्वय ठेवण्यासाठी सात जणांची समिती नेमण्यात आली असून ही समिती सर्व यंत्रणा ला
राबवणार आहे.यावेळी बोलताना संजय मशिनकर म्हणाले कीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार घराघरात पोहोचवण्याची ही एक चांगली संधी आहे शासनाच्या सर्व योजना घराघरापर्यंत पोहोचवा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी मोबाईल वरून मानले मशीलकर यांचे आभारमाढा लोकसभा मतदारसंघात दहा मॅरेथॉन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्यानंतर याची माहिती सोशल मीडिया वरून खासदार निंबाळकर पर्यंत पोहोचली यावेळी खासदारांनी थेट मशीन कर फोन करून दहा मॅरेथॉन सभा घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.
