Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळा

करमाळा नगरपरिषदेने राबविलेल्या पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहिर.

करमाळा प्रतिनिधी स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत यंदाच्या श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव स्पर्धा करमाळा नगरपरिषदेने घोषित केली होती. यात पर्यावरणपूरक श्री गणेश मुर्तीची स्थापना करणे, पर्यावरणपूरक सजावट करणे, निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्मिती ,विविध सामाजिक संदेश व जनजागृती करणे व विसर्जनाकरीता पर्यावरणपूरक पध्दत राबविणे या निकषांवर सदर स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेत उत्फुर्तपणे सहभाग घेवून करमाळकरांनी पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सवसाजरा केला. सदर स्पर्धेचा निकाल करमाळा नगरपरिषदेच्या वतीने पुढीलप्रमाणे जाहिर करण्यात येत आहे.
प्रथम क्रमांक (विभागून1) सीमा जाधव, खंदकरोड, प्रथम क्रमांक (विभागून2) दिपाली कोष्टी खंदकरोड, प्रथम कमांक मिळविणाऱ्या स्पर्धेकांनी वर्षेभर हिरवेगार जोपासलेल्या सेंदीय खतापासून घरच्या घरी निर्मित बगीच्यामध्ये पर्यावरणाच्या सानिध्यात अनेक सामाजिक संदेश देत, घरी स्वत: मातीपासून, मुलतानी मातीपासून बनविलेल्या श्री गणेश मुर्तीची स्थापना केली होती. यात सौ.जाधव यांनी श्री गणेश मुर्ती मध्ये पालकाच्या बिया घालून अंकूर गणपती बनविला होता. व विर्सजनानंतर त्याच मुर्तीपासून अनेक अंकूर निर्माण होणार असल्याचा अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली.तर श्रीमती कोष्टी यांनी अनेक सामाजिक संदेश देणारे व स्वच्छतेचे संदेश देणारे व “स्वच्छता हाच सण नाहीतर कायमचे आजारपण “हा संदेश देत जनप्रबोधन केले.
द्वितीय क्रमांक (विभागून1) सानिका चांदगुडे शाहूनगर , द्वितीय क्रमांक (विभागून2) श्रेया देवी गुरज गल्ली या दोन्ही स्पर्धकांनी अतिशय उत्कृष्ठ पर्यावरण पुरक सजावट, सुंदर संदेश देणाऱ्या रांगोळया, आकर्षक देखावे व पर्यावरण विर्सजन या मुद्यावर द्वितीय क्रमांक पटकवला.
तृतीय क्रमांक (विभागून1) सागर पवार साठेनगर, तृतीय क्रमांक (विभागून2) ओंकार झाडबुके खंदकरोड या दोन्ही स्पर्धेकांनी सुतळयापासून, टाकाऊ पुठ्ठयापासून, रंगीत कागद इ. पासून आकर्षक देखावे बनविले, कलाकृती मखर पर्यावरणपूरक सजावट सादर केली.
उत्तेजनार्थ विभागून-1 माया भागवत, गणेश नगर, 2 मयूर मिसाळ रंभापूरा, 3 सार्थक बाभळे महेंद्रनगर, 4 विजया चौरे कानाड गल्ली, 5 आरोही वनारसे वेताळपेठ, 6 काटुळे प्रणिता दत्तपेठ या स्पर्धेकांनी कागदाच्या लगदयापासून श्री गणेशमुर्ती स्थापना केली, पर्यावरणपूरक सजावट, घरगुती पध्दतीने श्री गणेश विसर्जन या निकषांवर उत्तेजनार्थ बक्षिस क्रमांक मिळवला आहे.
सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे मा.नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, व मुख्याधिकारी वीणा पवार यांनी अभिनंदन केले. सदर स्पर्धेचे परिक्षण मुख्याधिकारी वीणा पवार,कर निरीक्षक अश्वीनी पाटिल, लेखापरिक्षक समीर नदाफ, नगररचना अभियंता निखील गुरसाळे यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group