करमाळाशैक्षणिक

करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा इयत्ता 11 वी कला/ वाणिज्य /विज्ञान वर्गाचा निकाल जाहीर 

करमाळा प्रतिनिधी -करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी व देशभक्त नामदेवराव जगताप यांची पुण्यतिथी साजरी करून महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये इयत्ता 11 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील कला/ वाणिज्य /विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.
 *कला शाखेत* 
 1)कुमारी आवटे ऋतुजा आबासाहेब -92.67
2) कुमारी शेख सुमय्या रियाज -89.17 
3) कुमारी शेख सना रियाज- 86.67% गुण मिळाले तर
 *वाणिज्य शाखेमध्ये* 
1) श्री जाधव आदेश तुकाराम- 96.50% 
2) कुमारी वासानी खुशी हेतल- 93.50
3) श्री कुंभार ओंकार महावीर- 92.83% गुण. मिळाले.
 *विज्ञान शाखेतील* 1)कुमारी जगदाळे नम्रता बाळासाहेब -96.83%
2) कुमार गणेशकर प्रज्ञा विष्णू- 95.33
3) कुमारी कुलांगे प्राप्ती संतोष- 94.00% गुण . मिळाले .
 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार विजयश्री सभागृहांमध्ये विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना मा. विलासरावजी घुमरे सर यांनी सांगितले की महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीनींनी व विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी अगदी कमी खर्चामध्ये वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. तरी तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात प्रयत्न केले जातील असे सांगितले . तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. बी.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी सांगितले की करमाळा तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन केले . तसेच प्रा. लक्ष्मण राख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विजय वारुळे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.मुक्ता काटवटे यांनी केले . यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांपैकी कुमारी ऋतुजा आवटे , कुमारी नम्रता जगदाळे व कुमारी कुलांगे प्राप्ती यांनी आपले महाविद्यालयाविषयीचे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा.पोपट कुदळे यांनी मानले.
error: Don\'t try to copy. Content is protected !!