Uncategorized

दत्तकला रेडिओ स्टेशनचे भव्य उद्घाटन- स्थानिक संवादाला नवे बळ – डॉ प्रमोद पाटील

करमाळा प्रतिनिधी शैक्षणिक प्रचार व प्रसार, कृषीविषयक स्थानिक संवाद, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि माहिती प्रचार यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत दत्तकला इंजिनिअरिंग महाविद्यालयाने दत्तकला रेडिओ या रेडिओ स्टेशनचे थाटात उद्घाटन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सायन्स व टेक्नॉलॉजीचे डीन डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिवा सौ माया झोळ, सीईओ डॉ.विशाल बाबर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस ए पाटील, डॉ. उषादेवी पाटील आदी उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू केलेल्या या दत्तकला रेडिओ स्टेशनचे प्रक्षेपण हे इंटरनेट द्वारे करण्यात आले आहे सदरचे केंद्र 24 तास सुरू असून जगामध्ये इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी हे केंद्र एकता येणार आहे. दत्तकला रेडिओ स्टेशनचा उद्देश आणि कार्यपद्धती पाहिल्यानंतर टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रात एक क्रांती घडू शकेल असे मत डॉ. प्रमोद पाटील यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या

दत्तकला रेडिओ स्टेशनवर शैक्षणिक, सामाजिक, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अशा प्रख्यात व्यक्तिमत्वाच्या मुलाखती, ग्रामीण भागातील लोकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती, आरोग्यविषयी मार्गदर्शन, हवामान वृत्त, पर्यावरणाविषयी जनजागृती तसेच इतर १० वी, १२ वी तील यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती असे सर्व क्षेत्रातील कार्यक्रम दत्तकला रेडियो या केंद्रावरून प्रसारित करण्यात यावेत अशा सूचना संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिल्या.दत्तकला रेडिओ केंद्रासाठी सचिवा सौ.माया झोळ यांनी सर्वतोपरी सहकार्य करून समाजामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून रेडिओ केंद्राचा उपयोग व्हावा तसेच परिसरातील विकासाचा आढावा तसेच महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून महिलाना वेगवेगळ्या उद्योगांची माहिती दत्तकला रेडिओ केंद्रावरून मिळावी तसेच हा प्रकल्प स्थानिक जनतेच्या विकासास चालना देणारा ठरावा अशी अपेक्षा व्यक्त केली.दत्तकला रेडिओ केंद्र सुरू करण्यासाठी दत्तकला इंजिनिअरिंगच्या अकॅडमिक डीन प्रा. शीतल धायगुडे. IQAC समन्वयक प्रा. पल्लवी सूळ व कम्प्युटर विभागाचे प्रमुख डॉ. सचिन बेरे यांचा मोलाचा वाटा असून दत्तकला रेडिओ केंद्र सक्षमपणे चालविण्यात यावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य व आर्थिक मदत देण्याचे आश्वासन सचिवा सौ. माया झोळ यांनी दिले.दत्तकला रेडिओ केंद्राचे सर्वत्र कौतुक होत असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलगणीकरण असलेल्या महाविद्यालयामधील हे पहिलेच केंद्र आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!