करमाळा

करमाळा अर्बन बँकेच्या निवडणुकीत सौ.नंदिनी सुहास घोलप यांचा कन्हैयालाल देवी नेतृत्वाखाली स्व. गिरधरदास देवी प्रणित नागरिक संघटनेच्या जनहित पॅनलला जाहीर बिनशर्त पाठिंबा

करमाळा प्रतिनिधी करमाळा अर्बन बँकेच्या निवडणुकीमध्ये मा.श्री. कन्हैयालाल देवी अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली – स्व. गिरधरदास देवी प्रणित नागरिक संघटना जनहित पॅनलला सौ.नंदिनी सुहास घोलप जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला आहे. प्रसिद्ध पत्रक अध्यक्ष कन्हैयालाल देवी यांना सौ.नंदिनी सुहास घोलप यांचे पती करमाळा पत्रकार साप्ताहिक लोकमानस संपादक सुहास घोलप यांनी दिले आहे. या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे. की मी सौ. नंदिनी सुहास घोलप करमाळा अर्बन बँकेच्या पंचवार्षिक 2025-30 या काळासाठी होत असलेल्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी विमान या चिन्हावर अपक्ष म्हणून उभी आहे. परंतू बँकेच्या हितासाठी मी स्व. गिरधरदास देवी प्रणित नागरिक संघटना जनहित पॅनल ला बिनशर्त जाहीर पाठिंबा देत असून त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांना मतदान करून बहुमताने विजयी करण्याच्या आवाहन  सौ. नंदिनी सुहास घोलप यांनी केले आहे. अर्बन बँकेच्या निवडणुकीत सभासदांचे हिताला महत्त्व देऊन   बिनशर्त पाठिंबा दिल्याबद्दल पत्रकार सुहास घोलप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अर्बन बँकेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, बिनविरोध नूतन संचालक गोरख जाधव, जितेश कटरीया, भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण भाजपचे जेष्ठ नेते संजय आण्णा घोरपडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन सामाजिक कार्यकर्ते शहाजी ठोसर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!