शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड
करमाळा प्रतिनिधी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांची जिल्हा नियोजन समितीवर सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असणारे महेश दादा चिवटे करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष असून औद्योगिक वसाहतीचे चेअरमन आहेत. महाराष्ट्र राज्य शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश दादा चिवटे यांचे थोरले बंधू आहेत. करमाळा तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय चळवळीमध्ये त्यांचा सहभाग असतो.आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे प्रशासक म्हणुन काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा नियोजन समितीवर ची निवड करण्यात आली आहे पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्यांना 28 डिसेंबर रोजी संमारंभपुर्वक निवडीचे पत्र देण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल करमाळा तालुकावासियांकडुन अभिनंदन होत आहे.
