झरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मंजुश्री मुसळे बिनविरोध
करमाळा प्रतिनिधी : झरे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी आमदार संजयमामा शिंदे व स्व विलासराव पाटील गटाच्या मंजुश्री मयूर मुसळेची यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल गावात गुलालाची उधळण करत फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.झरे (तालुका करमाळा) ग्रामपंचायतच्या उपसरपंच मैना पोपट घाडगे यांनी राजीनामा दिलाने उपसरपंच पद रिक्त झाले होते. या ठिकाणी मंजुश्री मुसळे यांची उपसरपंच पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता कांबळे तर सचिव म्हणून ग्राम विकास अधिकारी गणेश कळसाईत यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनिता पाटील, भारत मोरे, बंडू घाडगे, मैना घाडगे, प्रशांत पाटील, बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते. निवडीनंतर गावात फटाके फोडून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी बबन घाडगे, बाळासाहेब घाडगे, भीमराव घाडगे, माजी उपसरपंच संतोष मुरूमकर, विजय माने, वस्ताद हनुमंत शिंदे, नारायण सुरवसे, माजी सरपंच बापू सरोदे, डॉक्टर शिवाजी काळे, किशोर पाटील, दादा पाटील, बाबासाहेब घाडगे, अनिल मिटे, पोपट घाडगे, संजय साबळे, दत्ता जाधव, दिलीप कांबळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
