गृहपाठ बंद केल्याने शिक्षणाच्या आईचा घो.. . तर होणार नाही ना ?
केत्तूर (अभय माने) शैक्षणिक जीवनाचा पाया असणाऱ्या इयत्ता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.या गृहपाठामुळे महत्त्वाच्या अभ्यासाची उजळणी होती परंतु, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जणू काही ” शिक्षणाच्या आईचा घो. . .” करायचे ठरवले आहे काय ? अशी शंका उपस्थित केली जात आहे व गृहपाठ बंद करण्याचा निर्णयाची सर्वस्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.शिक्षणमंत्र्याच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानच होणार आहे गृहपाठ पूर्वीप्रमाणे सुरू राहणे गरजेचे व महत्त्वाचे आहे.
जर गृहपाठ बंद केला तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार आहे.लेखन आणि वाचन या दोन्ही गोष्टी गृहपाठामुळे परिणामकारक ठरणार आहेत.
– अर्जुन पिंपरे,शिक्षक ,भगतवाडी
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शिक्षणाचा पायाही भक्कम होत असतो पहिली ते चौथी या शिक्षणावर अधिक भर देण्याची गरज असताना गृहपाठ बंदचा निर्णय आत्मघातकी ठरण्याची शक्यता मोठी आहे.
– विशाल नगरे,पालक,केत्तूर
गृहपाठ वर बंद झाला तर मुलांना म्हणावे तसे योग्य शिक्षण मिळणार नाही.
– किरण मत्रे,पालक, केत्तूर
विद्यार्थ्यांना गृहपाठ असणे गरजेचे आहे गृहपाठ मोजकाच असावा की तो मुलांना भविष्यात उपयोग होईल.
– नवनाथ पानसरे,पालक,केत्तूर
गृहपाठ नसेल तर घरी मुले दंगामस्ती करतील. टीव्ही तसेच इतर उद्योग करण्यात व्यस्त राहतील.गृहपाठ दिला तर विद्यार्थी घरी ही अभ्यास करतील.
– सुवर्णा निकम,पालक,केत्तूर
मुलांच्या लिहिण्या वाचण्याचा सराव बंद होईल त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानच होणार आहे.
– रूपाली महामुनी,पालक,केत्तूर
गृहपाठ बंद केल्यास मुलांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होईल.
– संजय माळशिकारे,पालक,गुलमोहरवाडी
कोणत्याही शिक्षण पद्धतीत सराव महत्त्वाचा भाग आहे. गृहपाठ हा पारंपारिक पद्धतीने न देता नाविन्यपूर्ण असावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
– भारती विघ्ने,पालक,
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करणेबाबत शासनाच्या निर्णयाबद्दल पालकांमधून उलटसुलत प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
बऱ्याच शिक्षणतज्ञांच्या मते लहान वयोगटातील मुलांना गृहपाठ देण्याची आवश्यकता नाही. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गात होणाऱ्या अभ्यास पुरेसा आहे तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाचा अतिरिक्त ताण होऊ नये या गोष्टींचा विचार करून शिक्षण तज्ञांनी हे मत मांडलेले आहे.
तरीही वर्गातील अभ्यास सर्वच विद्यार्थ्यांना पुरेसा होईल असे नाही. त्यासाठी घरीही सराव करून घेणे आवश्यक आहे. पूर्ण गृहपाठ बंद करण्यापेक्षा भारंभार गृहपाठ देणे टाळून विद्यार्थ्याला अतिरिक्त ताण येणार नाही अशा रीतीने गृहपाठ दिल्यास विद्यार्थी ही हसत खेळत गृहपाठ पूर्ण करतील.
– विकास काळे ,शिक्षक, केतूर २
