करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करा:-रविंद्र वळेकर
ओकरमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करा अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष रविंद्र वळेकर यांनी केली आहे.याबाबत त्यांनी करमाळा परिवहन आगर प्रमुख श्रीमती अश्विनी किर्दक यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,साध्य तालुक्यातील शाळा-कॉलेज चालू झाले आहेत.सध्या सार्वजनिक परिवहन सेवा विस्कळीत झाली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळा कॉलेजात जाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यां वाहतुकीसाठी एस टी विभागाने लवकरात लवकर नियोजन करावे अशी मागणी केली आहे.यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा शहराध्यक्ष ऍड शिवराज जगताप,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गौरव झांझुर्णे,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,जिल्हा सरचिटणीस महेश मोरे,जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वाघमारे आदी उपस्थित होते.