मांगी औद्योगिक क्षेत्रातील अडचणी सोडवणे बाबत उद्या मंत्रालयात बैठक… आ. संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मांगी रोडवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कार्यान्वित केल्या जात असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील अडचणी सोडवणे संदर्भात उद्योगमंत्री ना.आदितीताई तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दुपारी ४ वाजता उद्योग मंत्री यांचे दालनात बैठक आयोजित केली असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
मंत्रालयातील या बैठकीसाठी आमदार संजयमामा शिंदे उपस्थित राहणार असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत.तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सांगली येथील प्रादेशिक अधिकारी व कार्यकारी अधिकारी हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत .
उद्याच्या या बैठकीमुळे बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेला मांगी औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न सोडविण्यास निश्चितच हातभार लागणार असल्यामुळे तालुक्यातील युवकांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले आहेत.
