संघर्षाला मिळाला न्याय शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवुन दिल्याबद्दल आमदार संजयमामा शिंदे यांचे किरण कांबळे परिवाराने मानले आभार
करमाळा प्रतिनिधी शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून अनेक वर्षापासून संघर्ष सुरू होता परंतु या संघर्षाला तिलांजली देऊन शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम आमदार संजयमामा शिंदे प्रशासनाच्या कर्तृत्ववान तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी केले असल्याचे किरण कांबळे यांनी सांगितले.
करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल किरण कांबळे यांच्या वतीने करमाळा येथील संजय मामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात मामांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक महादेव आण्णा फंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजीत बागल उपस्थित होते.त्याबाबत याबाबत बोलताना किरण कांबळे यांनी सांगितले की आपण आमदार संजयमामा शिंदे यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली करमाळा तहसील कार्यालयात अर्ज केला होता. अर्ज दाखल केला आणि तत्कालीन तहसीलदार समीर माने यांची बदली झाली. त्यानंतर अनेक दिवस तहसीलदार नव्हते. त्यामुळे आम्हाला न्याय मिळत नव्हता. त्यामुळे आमचे शेत पडीक पडले होते. शेतात जाता येत नसल्याने पेरणी करता आली नाही. परंतु तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी याची दाखल घेऊन रस्ता देण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामा, स्थळ पहाणी अशी कायदेशीर प्रक्रिया करून आम्हाला रस्त्यासाठी न्याय दिला आहे. त्यामुळे अनेक वर्षाची आमची संघर्षाच्या लढाईला यश आले असून आमदार संजय मामा शिंदे तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे मनापासून आभार मानले आहेत.
