*करमाळा तालुक्यातील घारगावच्या आदर्श माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे वतीने राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहातर्फे घारगावच्या आदर्श माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आला आहे असे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियाचे मुख्य संपादक राहुल कुदनर यांनी निवड पत्र देऊन कळवण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी थेऊर फाटा एस फोर जी हॉटेल सोलापूर रोड पुणे येथे होणार आहे त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असे कळविण्यात आले आहे. पुरस्कार जाहीर होताच सर्व आप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ सर्व स्तरांमधून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
