कोर्टी येथे श्री शिव गणेश मंडळ श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना व पूजा करमाळा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते दिग्विजय भैय्या बागल यांच्या हस्ते संपन्न
कोटी प्रतिनिधी मौजे कोर्टी येथे श्री शिव गणेश मंडळ श्रींची मूर्ती स्थापन व पूजा करमाळा तालुक्यातील युवकांचे आशास्थान भारतीय जनता पार्टी चे युवा नेते दिग्विजय भैय्या बागल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी सामाजिक उपक्रम म्हणून वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने भाजपा नेते दिग्विजय भैय्या बागल यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळीज्येष्ठ नेते मनोहर शेरे, हनुमंत जाधव, राजाभाऊ शितोळे, हनुमंत हुलगे, दासा आप्पा हुलगे,मकाई चे संचालक श्री आशिष गायकवाड, मनोज शेरे, सरपंच भाग्यश्री मेहेर, उपसरपंच नाना झाकणे,बाजार समितीचे माजी संचालक आनंदकुमार ढेरे, ग्रामपंचायत सदस्य महेश शितोळे, प्रवीण कदम, गणेश मंडळाचे अध्यक्ष सुनील गिरमे, सयाजी जाधव, अक्षय दळवी, पद्माकर निकत, तेजस देमुंडे, सचिन नवले, राहुल झाकणे, सुधीर चव्हाण, स्वप्नील शेरे, दीपक माने, भरत माने, शुभम जाधव, निलेश शिंदे,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
