मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिटेवाडी सिंचन योजना मंजूर करण्याचे दिले आश्वासन बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांच्या मागणीला यश
करमाळा प्रतिनीधी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मोळीपूजनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करमाळा दौ-या रिटेवाडी सिंचन योजना बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी केलेल्या मागणीला मंजूर करण्याचे आश्वासन दिल्यामुळे यशस्वी झाला असल्याची चर्चा होत आहे.
रिटेवाडी सिंचन योजना हा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी प्रकल्प योजना आहे. बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदिनाथ कारखाना दौ-यात केलेल्या मागणीला शिंदे यांनी त्वरीत ही योजना मंजूर करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले. या योजनेमुळे तालुक्यातील मोठ्या क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सदर योजना मंजूर करण्यासाठी बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेचे या भागातील लोकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
रिटेवाडी सिंचन योजना हा तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पुढे आज आदिनाथ कारखाना मोळी पूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने रिटेवाडी सिंचन योजना मंजूर करण्यासाठी आपण मागणी केली, या योजनेस आपण त्वरीत मंजूर करत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे या योजनेत येणारी गावे ओलिताखाली येतील.
रश्मी दिदी बागल, संचालिका महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ