चांडगाव ता इंदापुर ते पोमलवाडी ता करमाळा दरम्यान उजनीवरील पुलाचे सर्व्हेक्षण पुर्ण- लवकरच पुलाची मंजुरी- माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पाठपुराव्याला येणार यश- ॲड अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी
चांडगाव ते पोमलवाडी दरम्यान उजनीवरील सर्वात कमी अंतर असुन पाण्याची खोली जास्तीत जास्त साठ फुट आहे . या ठिकाणी पुलास मंजुरी मिळणे बाबत माजी आमदार संजयमामा शिंदे व मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी मागिल काळात केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते एडवोकेट अजित विघ्ने यांनी दिली.या पुलास मागिल सरकारचे काळात पुरवणी बजेट मधे देखिल निधी मिळणेकामी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुचवलेले होते. याबाबत तातडीने सर्व्हे करून या पुलाची मंजुरी देण्यात येणार असुन नामदार भरणेमामा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. कालच या ठिकाणी सर्व्हेक्षण झालेले असुने लोणी देवकर ते चांडगाव आणि पोमलवाडी भागातील कनेक्टेड रस्त्यांचे देखिल सर्वेक्षण करण्यात आले आहे. लवकरच या ठिकाणी पुलाला मंजुरी मिळेल ज्यामुळे शिखर शिंगणापुर ते तुळजापुर करमाळा मार्गे जाणारा नवीन जवळचा पर्यटन मार्ग अस्तित्वात येणार आहे. या बद्दल येथील नागरिक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , नामदार भरणे मामा व माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे अभिनंदन करीत आहेत.
