Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

संत निवृती महाराज दिंडी वारकऱ्यांसाठी पाण्याची सोय करण्याचा प्रा.रामदास झोळ फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम- दादासाहेब जाधव

करमाळा प्रतिनिधी संतश्रेष्ठ निवृती महाराज पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करून वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. संत निवृत्ती महाराज पालखीच्या स्वागता प्रसंगी प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून टॅंकरचे नियोजन केल्याबद्दल दुष्काळी परिस्थितीमध्ये गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा शुभारंभ केल्याबद्दल प्रा. रामदास झोळ यांचा सत्कार ग्रामपंचायत रावगाव ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाप्रसंगी राव गावचे सरपंच दादासाहेब जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र गोडगे ओबीसी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गफूर भाई शेख माजी सरपंच भगवान डोंबाळे गोपीनाथ झिंजाडे सुदर्शन शेळके उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की सध्याच्या युगामध्ये माणुसकी धर्माचा विसर पडत असून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्मातुन मानवतेची खरी शिकवण भक्तीच्या माध्यमातून मिळत असून ऊन वारा तहान भूक विसरून विठ्ठलाच्या नामामध्ये दंग होणारे वारकरी बघितल्यानंतर परमार्थातच खरा आनंद असल्याचे जाणवते. संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या पालखीची वारकऱ्यांची सेवा करण्याचा मान करमाळा तालुक्यातील रावगाववासियांना मिळतो एक आमचे भाग्य असल्याचे सरपंच दादासाहेब जाधव यांनी सांगितले .यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक रामदास झोळसर म्हणाले की सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपणही काम केले असून सामाजिक उपक्रमासाठी आपण सहकार्य करणार असून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व रोजगार मिळवुन देण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group