Uncategorized

नेरले सोसायटी गैरकारभारविषयी कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण स्थगित-औदुंबरराजे भोसले

करमाळा प्रतिनिधी नेरले सोसायटी गैरकारभार विषयी कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आजचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.नेरलेचे माजी सरपंच श्री  औदुंबरराजे भोसले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नेरलेचे सभासद कमी करणे सभासद रकमेचा अपहार करणे बोगस सभासद समाविष्ट करणे प्रारूप व अंतिम यादी प्रसिद्ध न करता निवडणूक जाहीर करणे मागितलेली माहिती न देणे या संदर्भात आज दिनांक पाच मे रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता .परंतु सहाय्यक निबंधक करमाळा यांनी आठ दिवसांमध्ये योग्य तो निर्णय घेऊ असे लेखी आश्वासन दिल्यामुळे व भारत पाकिस्तान युद्धाची संभावना असल्यामुळे उपोषण स्थगित करण्यात येत आहे अशी माहिती नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच श्री औदुंबरराजे भोसले यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!