Uncategorizedकरमाळासकारात्मक

सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे जेऊरचे पोस्ट ऑफिस रविवारी खुले

जेऊर प्रतिनिधी तुषार घोलप
जेऊर ता. करमाळा येथील पोस्ट ऑफिस मध्ये रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही रक्षाबंधनासाठी बहिणींनी पाठवलेल्या प्रेमाच्या राख्या कोरोना महामारी मध्ये बहिणी रक्षाबंधन साठी आपल्या माहेरी येऊ शकत नाहीत म्हणून बहिणींनी पोस्ट ऑफिस मार्फत रजिस्टरने हजारो राख्या पाठवल्या यामध्ये रक्षाबंधन सोमवारी दिनांक ३ रोजी असल्यामुळे पोस्ट ऑफिस ऑफिसर डी.बी. चेंडगे जेऊरचे पोस्टमास्तर व पोस्टमन व्ही.बी. कुलकर्णी, पी.पी. गावडे, तसेच जेऊर परिसरातील २९ ग्रामीण गावाचे पोस्टमन कामाची लगबग करून लवकरात लवकर रक्षा पाकीट गावोगावी पोहोच करताना दिसून येत होती.
या जिव्हाळ्याच्या सणासाठी पोस्ट ऑफिसचे सर्व कर्मचाऱ्यांचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे. रविवार असतानाही पोस्टमन आपल्या दारी हा उपक्रम राबविल्या बद्दल सर्व बहिणी मधून आभार व्यक्त केले जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!