करमाळा येथील सौ.प्रियांका सागर गायकवाड समाजभूषण पुरस्काराने सन्मानित.

करमाळा प्रतिनिधी-
करमाळा, जि. सोलापूर येथील परीट (धोबी) समाजाच्या रणरागिणी- महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ च्या सोलापूर जिल्हा (महिला) उपाध्यक्षा प्रियांकाताई सागर गायकवाड यांनी सांगली – कोल्हापूर भागात ज्यावेळी भयानक असे महापुराचे संकट आले होते त्यावेळी समाज संघटना तसेच त्या करत असलेल्या पक्षीय समाज कारणा अन्वये त्यांनी आपल्या स्व:खर्चाने तसेच इतर बांधवांना आवाहन करून त्यांकडून मदत मिळवून खूप मोठी मदत सांगली व कोल्हापूर भागामध्ये पाठवली होती तसेच चालु काळामध्ये असलेल्या कोरोनाच्या संकटातही त्यांचे लोकांना खूप उम्मेदीने मदत करण्याचे काम त्या करत आल्या आहेत व करत आहेत…
परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, भारत चे संचालक चेतन शिंदे आणि संस्थेच्या इतर संचालक व सदस्यांनी प्रियांकाताई गायकवाड यांच्या कार्याची दखल घेतली होती त्यानुसार त्यांना संस्थेच्या वतीने ‘समाजभूषण पुरस्कार’ देण्यात आला…
परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, भारत च्या वतीने संस्थेचे सदस्य संतोष केरू दळवी आणि संदिप आढाव यांनी करमाळा येथे जाऊन त्यांना सन्मानपत्र दिले तसेच यावेळी परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, भारत च्या वतीने करमाळा येथील बांधवांसाठी तेथे आर्सेनिक अल्बम होमिओपॅथीक गोळ्या तसेच मास्क देण्यात आले…
यावेळी शंकर सुरवसे, अशोक ननवरे, रावसाहेब सावरे, दिलीप सुरवसे, शिवाजी गायकवाड, सागर गायकवाड, विशाल गायकवाड, अभिजित कारंडे, नागेश सुरवसे इ. उपस्थित होते..
प्रियांकाताई सागर गायकवाड यांना समाजभूषण पुरस्कार मिळालेबद्दल मुंबई येथील धोबी समाजाचे नेते, महाराष्ट्र धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समितीचे प्रमुख, उद्योजक रमाकांत कदम, आरक्षण समन्वय समितीचे कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ चे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार, धोबी समाजाचे सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे नेते शिवसेना पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष नामदेवनाना वाघमारे, परीट सेवा मंडळ चे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच अखिल भारतीय धोबी महासंघ दिल्ली चे उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, आरक्षण समितीचे कार्यालयीन सचिव संतोष बंधू सवतीरकर, आरक्षण समन्वय समितीचे कोषाध्यक्ष मुरलीधर शिंदे, परीट सेवा मंडळ च्या कोअर कमिटीचे चेअरमन किसनरावजी जोर्वेकर, सदस्य रवी राऊत, महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळ चे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे, परीट सेवा मंडळ चे युवा प्रदेशाध्यक्ष संतोष भालेकर, महिला प्रदेशाध्यक्षा सीमाताई रंधे, कार्याध्यक्षा सुषमाताई अमृतकर, धोबी समाज आरक्षण अभ्यास समितीचे प्रमुख प्रा. पंढरीनाथ रोकडे, प्रदेश उपाध्यक्ष शांतीलाल कारंडे, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष , हरिभाऊ काळे, वामनराव पेनूरकर, तंटामुक्ती समितीचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, उपाध्यक्ष देवा नवले, नागपूर येथील धोबी समाज संघटनेचे ज्येष्ठ नेते दिलीप शिरपूरकर, परीट सेवा मंडळ च्या शासकीय तसेच निमशासकीय विभागाचे संघटक दयानंद पवार, परीट सेवा मंडळ चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय घोडके, महिला जिल्हाध्यक्षा मनिषाताई गायकवाड, सोलापूर जिल्हा सचिव दत्तात्रय क्षीरसागर, महादेव नवले, आरक्षण समिती चे उपाध्यक्ष सुनिल शिंदे, राज्य कार्यकारणी सदस्य राजेंद्र पवार, रत्नागिरी परीट समाज संस्थेचे अध्यक्ष दिपकराव कदम, परीट सेवा मंडळ चे सांगली जिल्हाध्यक्ष अशोकराव शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाशराव मेहरबान, नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष औंढेकर, परीट समाज संस्थेचे मा. नगर जिल्हाध्यक्ष रविंद्र क्षीरसागर, पुणे जिल्हा माजी अध्यक्ष शाम कदम, परीट सेवा मंडळ चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पवार, खजिनदार प्रशांत राऊत, समाज संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष गणेश ननवरे, परीट समाज संस्थेचे बारामती शहराध्यक्ष निलेश पवार, बारामती समाज संघटनेचे आधारस्तंभ उमेश ननवरे, बारामती तालुका अध्यक्ष संग्राम पवार, साप्ताहिक लढाऊ लेखणीचे संपादक संदिप महाले, मार्मिक समाचार न्यूज पोर्टल चे संपादक सुनिल सूर्यवंशी आणि इतर समाजनेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
