स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा जनजागृती मोहीम राबवणार – बालाजी लोंढे, मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त करमाळा शहरातील प्रत्येक घरा मध्ये हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात येणार आहे
देशाला 75 वर्षे पूर्ण झाली असून देशाच्या स्वातंत्र्याची, लोकशाहीची, एकात्मतेची, विकासाची गौरवशाली 75 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे सदरचे अभियान राबविणार असल्याची माहिती करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी दिली.
तसेच पुढे बोलताना मुख्याधिकारी लोंढे म्हणाले की देशाला 75 वर्षे पूर्ण झाली असून हर घर तिरंगा ही संकल्पना शहरातील प्रत्येक नागरिकांच्या उस्फूर्त अशा प्रतिसादामुळे पूर्णत्वास नेण्यास मदत होईल.
यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने हर घर तिरंगा या झेंडा विक्री केंद्राचे उद्घाटनपर करमाळा नगरपरिषदेत पार पडले. याप्रसंगी नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
