करमाळासकारात्मक

हर घर तिरंगा अभियनाचा करमाळ्यात शुभारंभ मुस्लिम समाजाचा अनोखा उपक्रम

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट . डाॅ ए.पी जे अब्दुल कलाम आझाद फाऊंडेशन. रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट मुस्लिम विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव या अंतर्गत हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमाचा शुभारंभ करमाळा तालुक्याचे नायब तहसीलदार सुभाष बदे यांच्या शुभहस्ते व करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नरसिंहजी चिवटे नगरसेवक हाजी अल्ताफशेठ ताबोंळी, शिवसेनेचे नेते संजय शिंदे मनसेचे ता अध्यक्ष संजय घोलप मंडळाधिकारी हाजी सादीकभाई काझी मंडलाधिकारी युसूफ बागवान नितीन आढाव विजय देशपांडे बांधकाम अभियंता विशाल मुळे आदी जणांच्या उपस्थित झाला
यावेळी बोलताना नायब तहसीलदार सुभाष बदे म्हणाले की हर घर तिरंगा या विशेष शासनाचा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट ते दिनांक 15 ऑगस्ट दरम्यान झेंडा कश्या प्रकारे लावायचा व भारतीय ध्वजाचा कुठे ही अवमान होणार नाही व अप्रिय घटना घडु नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन केले व मुस्लिम समाजाच्या या उपक्रमाचे कौतुक केले .यावेळी ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्य सैनिक नरसिंहजी चिवटे मुख्याधिकारी बालाजी लोंढे नगरसेवक अल्ताफ शेठ ताबोंळी यांनी मनोगत व्यक्त केले .
हर घर तिरंगा हा विशेष उपक्रम अभियान यशस्वी करण्यासाठी समीर शेख करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार मुस्लिम विकास परिषदचे अध्यक्ष फारूक बेग जामा मस्जिद चे विश्वस्त जमीर सय्यद हाजी आसिफ शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आझाद शेख काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर पठाण सामाजिक कार्यकर्ते सुरज शेख राजू बेग पै.समीर शेख रमजान पिंटू बेग अकबर बेग आलीम खान कलीम शेख खलीलभाई मुलाणी शकील शेख हारूण वस्ताद मैनुद्दीन खर्डेकर आदी जणानी परिश्रम घेतले यावेळी तिनशे झेंडे नागरिकांना वाटण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारूक जमादार यांनी केले तर आभार समीर शेख यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group