मंगेश बदरनी मदार चित्रपटाच्या माध्यमातून करमाळा तालुक्याचा नावलौकिक वाढवला -चिंतामणी दादा जगताप
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे सुपुत्र मंगेश बदर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मदार मराठी चित्रपटाची निर्मिती करून विक्रमी पुरस्कार मिळवून करमाळा तालुक्याचा नावलौकिक वाढवला असून त्याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो असे मत कृषी बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी दादा जगताप यांनी व्यक्त केले. जगताप कुटुंबाच्यावतीने मदारचे दिग्दर्शक मंगेश बदर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप माजी नगरसेवक राहुल भैया जगताप,काॅग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप यांनी मानाचा फेटा बांधुन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमास पत्रकार दिनेश मडके, गणेश शेलार, सुहास गायकवाड नितीन आरणे उपस्थित होते. याबाबत पुढे बोलताना चिंतामणी दादा जगताप म्हणाले की पाणी संघर्ष या जागतिक प्रश्नावर दिग्दर्शक मंगेश बदर यांनी चित्रपट निर्मिती केली असून करमाळयाच्या मातीतल्या तरुणाने कुठलेही प्रकारचा वारसा पाठबळ नसताना केवळ जिद्द चिकाटी,परिश्रम कल्पनाशक्ती प्रतिभेच्या जोरावर चित्रपट क्षेत्रात आपला नावाचा डंका बजावण्याची कमाल केली आहे. जगताप गटांनी नेहमीच कलाकाराच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असून करमाळा फेस्टिवलच्या माध्यमातून करमाळा तालुक्यामध्ये सांस्कृतिक चळवळ वाढवण्याचे काम केले आहे मंगेश बदर यासारख्या प्रतिभासंप्पन नवतरुणाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आपण चित्रपट निर्मितीच्याबाबतीत आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
